आनंदनगर झोपडपट्टीत दोघांना मारहाण

0

चिंचवड : वाढदिवसाला मुले जमा करतात, या कारणावरून जाब विचारत दोघांना तीन ते चार तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 11) रोजी रात्री बाराच्या सुमारास चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी रस्त्यावर घडली. आशिष भारत पारडे (वय 25) व अजय खंडू गायकवाड (दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी आशिष पारडे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय अनिल लव्हे (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यात अडवून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष पारडे आणि अजय गायकवाड हे दोघे रात्रीच्यावेळी त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी पारडेचा ओळखीचा असलेल्या अजय लव्हे व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना रस्त्यात अडवले. तुम्ही राहता त्या ठिकाणी कोण वाढदिवस साजरा करतो. तिथे मोरे वस्ती येथील बरीच मुले आली आहेत, तुम्ही भाई बनण्याच्या प्रयत्न करता का, असे विचारात दोघांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत लव्हे याने सिमेंटचा गट्टू गायकवाड याच्या कपाळावर मारला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.