आनंदराज आंबेडकर यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश नाही

0

नवी दिल्ली: रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त होते, मात्र कॉंग्रेसने हे वृत्त फेटाळले असून आनंदराज आंबेडकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलं होतं.