चाळीसगाव । गेल्या वर्षभरापासून आनंदवाडी परिसरातील समस्या सोडविल्या जात नसल्याने अखेर जनआंदोलन खान्देश विभागातर्फे नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले. 3 जानेवारी रोजीही आंदोलन करण्यात आले होते, मात्र तेव्हा पोकळ आश्वासने देऊन हे आंदोन मागे घेण्यास सांगण्यात आले होते, असे निवेदनात म्हटले आहे.
विविध मागण्या
चाळीसगाव शहरातील आनंदवाडी परिसरात ब्रीज कॉर्नरपर्यंत भुयारी गटार तयार करणे, आनंदवाडीमध्ये नवीन शौचालयाची निर्मिती करणे, गटारीतून जाणारी पाईपलाई बंद करून नवीन पाईपलाईन टाकावी, शौचालय, गटारींची नियमित स्वचछता व्हावी, शाळा क्रमांक दोनच्या आवाहरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय सभागृह उभारावे आदी मागण्या करण्यात आल्या आहे. या मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष झाल्याने अखेर 18 रोजी जनआंदोलन खान्ेदश विभागाने धरणे आंदोलन केले. निवेदनावर प्रा. गौतम निकम, आबा गुजर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, वारीस शेख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.