जळगाव – ज्या जळगाव जिल्ह्याला कोरोनाच्या मृत्यूने वेढा घातला होता .त्याच जळगाव जिल्हात आज कोरोनामुळे आज एकही मृत्यू झालेला नाही. तब्बल ४ महिन्यानंतर जळगाव जिल्ह्यात कोरोना मृत्यूची आकडेवारी ० वर आली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर दिवसाला २० पर्यंत पोहोचला होता. आज तीच आकडेवारी ० वर पोहोचली आहे. यामुळे जिलह्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.