ओस्लो: संपूर्ण जगाला कोरोना लसीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपलेली असून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. जगभरात आणि भारतातही कालपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यामुळे आशादायी वातावरण तयार झाले आहे. मात्र लसीकरणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आणखी भर पडली आहे. धक्कादायक असे वृत्त समोर आले आहे. नॉर्वेमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नॉर्वे सरकारसमोर नव्या संकट उभे आहे. फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर या घटना घडल्या आहेत.
डिसेंबर २७ पासून नॉर्वेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली असून, फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. नॉर्वेमध्ये फायझर बायोएनटेक तयार केलेली लसच उपलब्ध झालेली आहे. लसीकरणानंतर झालेले मृत्यू या लसीशी संबंधितच आहे.