आनंदी जीवनाचा मंत्र ‘योगसाधना ’

0

धरणगाव । जगण्याचा आनंद घेण्यासाठी योगविद्या आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतीय ऋषीमुनींनी आनंदी जीवनाचा मंत्रच योगसाधना सांगितला आहे. आधुनीक जगात आणि धवाधवीच्या या जिवनात नागरिकांनी शारिरीक मानसीक स्वास्थासाठी प्रत्येक दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन योगतज्ञ यांनी आज जागतीक योग दिनानिमित्त उपस्थितांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धरणगाव येथील प.रा.विद्यालयात प्रविण बोरोले यांनी, शेंदुर्णी गरूड विद्यालयात मुख्याध्यापक बी.जी. मांडवडे यांनी, पाचोरा शहरातील जागृती विद्यालयात मुख्याध्यापक आर.एस.वाणी यांनी योगाचे शारीरावर होणारे फायदे व योगा कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तर देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्व विशद केले.

शेंदुर्णी गरूड माध्यमिक विद्यालय
शेंदुर्णी । येथील आचार्य गजाननराव गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रांगणात सकाळी 7 वाजता मुख्याध्यापक बी.जी. मांडवडे व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांसह विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्यासह स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी प्रशिक्षक, शिक्षक आबा पाटील यांचेकडून योगाभ्यासाचे धडे घेतले, तसेच सरस्वती विद्यामंदिर, श्री कृष्ण माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी योगासने केली.

जागृती विद्यालयात योगादिन साजरा
पाचोरा । शहरातील जागृती विद्यालयात जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. विद्यालयातील मुख्याध्यापक आर.एस.वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी योगादिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांकडुन शिक्षकांनी योगा करुन घेतला. योगाचे महत्व व आपल्या दैनंदिन जिवनात योगा किती उपयुक्त आहे. याची माहीती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

देवगांव देवळी फुले हायस्कुलमध्ये योगा
अमळनेर । देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्व विशद केले. शरीर स्वास्थ ठेवायचे असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी दररोज योगा केला पाहीजे व आपल्या परीवारातील नातेवाईकांना योगा करण्यास सांगितले. शरीर चांगले राहून आजारापासून मुक्ती मिळेल, असे सांगितले तर शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी योगाचे प्रत्याक्षिक करून दाखविले सर्व शाळेचे विद्याथीॅ यांनी योगा केला. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एस.के. महाजन, अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते.