राजगुरुनगर : पंचक्रोशीतील देशमुखवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना आनंदी मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने बुटांचे वाटप करण्यात आले. या शाळेत वहागाव, देशमुखवाडी, भालसिंगवाडी, आवळेवाडीसह पंचक्रोशीतील वस्तीवरील मुले शिकण्यासाठी येतात. प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे 140 विदयार्थ्यांना बुटांचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय साहित्यात दप्तर, वहया, पेन, कंपास या शालेपयोगी वस्तूंचा समावेश आहे. या वेळी प्रतिष्ठानचे गणेश लुंकड यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.