आनंदी रहा मृत्यू, जुनाट आजारांना पळवा

0

न्यूयॉर्क : जीवनामध्ये उत्साह, आनंद आणि शांती या भावनांचे प्राबल्य असेल तर जुनाट आजार, अकाली मृत्यू यांच्यापासून माणसाची सुटका होते, असा दावा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

अँथनी ओंग यांच्या मते माणसाला आनंदाची तसेच अनेक भावनांची अनुभूती हवी. भावनिक आयुष्य एकाच भावनेने व्यापून राहणे मानसशास्त्रीय विकृतींना निमंत्रण देणारे असते. आनंदभावनेमुळे होणारे शरीरक्रियांमधील बदल दीर्घकालीन फायदे देणारे असतात. भावनांचे वैविध्य नसलेले केवळ एकाच शरीर क्रियेवर अडतात. या उलट अनेक भावनांशी संबंध येणाऱ्यांच्यात अनेक शरीरांतर्गत रासायनिक उलथापालथी होत असतात.

संशोधकांनी १७५ लोकांचा अभ्यास केला. ते ४० ते ६५ वयोगटतील होते. त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा महिनाभर त्यांनी निरीक्षण केले. रोज संध्याकाळी १६ सकारात्मक भावनांबद्दल ते नमुन्यातील लोकांना विचारले जाई. त्यांना पवित्र, भय, उदास, लाज किंवा अन्य कोणती भावना मनात निर्माण होते हे अनुभव कथन करण्यास सांगितले जाई. सहा महिन्यांनतर त्यांचे रक्तही तपासण्यात आले. रक्तदाब, मधुमेह, संधीवात आदी रोगांचा संबंध भावनांशी आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक भावना शरीराशी संबंधित आहेत, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.