आनंद देणारा क्षण चाळीसगाव फेस्टीव्हल

0

चाळीसगाव । जीवनात आनंदी राहणे हे उत्तम शरीरासाठी महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात जो तो यशासाठी, पैशांसाठी धावपळ करीत आहे. मात्र या फेस्टीव्हल च्या माध्यमातून कुटूंबासह आनंद मोलाचा आहे, याशिवाय येथील वातारणात माणूस रमत जाऊन सर्व विसरून जगण्याचा खरा आनंद घेतो अशी भावना चाळीसगाव पेैस्टीव्हल च्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हा बँक संचालक राजीवदादा देशमुख यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी रोटरी अध्यक्षा मेघा बक्षी, सचिव व प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संतोष मालपुरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, भुषण ब्राम्हणकार, डॉ. सुनिल राजपूत, सुभाष करवा, वसंत चंद्रात्रे, लालचंद बजाज, चंद्रकांत ठोंबरे, अरूण भावसार, राजेश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजीवदादा देशमुख पुढे म्हणाले कि, चाळीसगाव फेस्टीव्हल ने एकाच दालनात विविध नाविण्यपुर्ण स्टॉल धारकांना संधी उपलब्ध करून दिल्याने चाळीसगाव तालुक्यात उद्योग धंद्यांसह सृजनशील वातावरण निर्मीती करून दिली ही बाब अभिमानास्पद व कौतुकास पात्र आहे. असे सांगितले.

नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी 7 दिवस चाललेला फेस्टीव्हल हा फेस्टीव्हल नाहीतर माणसांमध्ये वैचारीक, संस्कृती रूजवणारा व सांस्कृतिक महोत्सव असल्याच्या भावना व्यक्त केल्या. हा फेस्टीव्हल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे दिपक पाटील, चंद्रकांत पाटील संजय सोनवणे, सुनिता जाधव, गणेश निकुंभ यांच्या सह ज्या शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना 1 ते 3 क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. पेैस्टीव्हल मध्ये कुमारी माधुरी चौधरी हिने बसविलेला संवेदशील सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमातून आपल्या हक्कांसोबत कर्तव्याची हि जाण करून देण्यात आली. यावेळी माधुरी चौधरी हिचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष मालपुरे यांनी तर सुत्रसंचालन प्राचार्या सुनिता जाधव, दिपक पाटील यांनी केले. तर आभार लालचंद बजाज यांनी मानले. कार्यक्रमास देविदास दायमा, भरत दायमा, केशवआप्पा कोतकर, डॉ. हरीष दवे, शैला छाजेड, रमेश पोतदार, लिलावती जगताप, डॉ.डी.एस.निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड.ज्योती धर्मानी, चंद्रकांत पाटील, संजय सोनवणे, किशन चौधरी, माधुरी जाधव, बालाप्रसाद राणा, गणेश निकुंभ, राजेंद्र छाजेड, डॉ.हरीष राजानी, डॉ.भाग्यश्री शिनकर, माया सावंत, आदींनी परिश्रम घेतले.