आनंद बिझनेस सौर उर्जा प्लान्टचे उद्घाटन

0

जळगाव । कर्तृत्व आणि नम्रता याचे समन्वय फार कमी ठिकाणी मिळतो आणि ज्यांचाजवळ हा समन्वय असतो तो परिवार ती व्यक्ती जीवनात यशस्वी होतो असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पाळधी जवळील आनंद बिझनेस सौर उर्जा प्लांन्टचे पालकमंत्र्यांच्या यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, दलूभाऊ जैन, अभय जैन, भरत अमळकर उपस्थित होते. प्रकल्पाविषयी संतोष कुलकर्णी यांनी माहिती देत कमलादेवी कोठारी, ललिता कोठारी, विमला कोठारी, संगीता कोठारी, नीता कोठारी यांनी नवकार मंत्र पठण केले. स्व. पद्मश्री भवरलाल जैन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी यापूर्वी दिलेल्या शुभेच्छा विडीओ क्लिपद्वारे प्रदर्शित करण्यात आल्या. प्रास्ताविक जितेंद्र कोठारी यांनी केले. जळगाव येथील आर.जे. फाउंडेशन, समाधान बुक डेपो पाचोरा, रिध्दीसिध्दी एन्टरप्राईज या उत्कृष्ट तीन फ्रान्चाइझीचा सत्कार करण्यात आला.