आनंद स्कूलची आकांशा हाडवळे प्रथम

0

स्कूलचा 100 टक्के निकाल

चिंबळी : कुरूळी येथील आनंद मेडिकल फाऊंडेशन संचालित आनंद इंग्लिश मिडीयम स्कुलचा इयत्ता दहावीचा प्रथम वर्षीय बॅचचा निकाल 100% लागला असल्याचे. आनंद स्कुलचे 13 पैकी 13 वि÷द्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रं. आकांशा हाडवळे 93.20 टक्के, द्वितीय क्रं. साक्षी फडके 89 टक्के, तर तृतीय क्रं. प्रतिक्षा सोनावणे 86 टक्के यांनी पटकाविला आहे. या विद्यार्थ्यांनी भरघोस असे यश संपादनकरून प्रथम वर्षीय बॅचचा निकाल 100 टक्के लावून स्कुलचे आणि गावाचे नाव मोठे केले असल्याचे, संस्थापक-अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी सांगतिले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती परिसरातील आनंद इंग्लिश मिडीयम स्कुलची ही प्रथम बॅच होती. या बॅचचा निकाल 100 टक्के लागला आहे. मोई येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा 97.61 टक्के लागला आहे. त्यामुळे या दोन्ही विद्यालयांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

गजानन मंकीकर, अनघा काळे, सरपंच चंद्रकांत बधाले, माजी उपसंरपच अमित मुर्‍हे, नितिन गायकवाड, प्रज्ञा गुरव, आशिष मुर्‍हे, चेअरमन अनिल बांगडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनावणे, शांताराम घाडगे, बाळासाहेब बांगडे, बाळासाहेब सोनावणे, भरत कडे, रमेश बांगडे, शाळा समिती अध्यक्ष चंदकात सोनवणे आदींनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

इंदिरा विद्यालयाचा 97.61 टक्के निकाल
मोई येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.61 टक्के लागला असल्याचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे यांनी सांगतिले. या विद्यालयातील 42 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. त्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रं. ऐश्‍वर्या येळवंडे 91.61 टक्के, द्वितीय क्र. रोहित गवारे 89.40 टक्के तर तृतीय क्रं. गौरव गवारे 85.80 टक्के गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थापक-अध्यक्ष तुकाराम गवारे, शहाजी कर्पे, माजी सरपंच पुष्पाजंली कर्पे, एकनाथ कर्पे, सरपंच अरूण फलके, उपसंरपच गिताजंली गवारे, सारिका गवारे, पल्ली गवारे, माजी सरपंच अनुराधा गवारे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आनंदा गवारे, माजी चेअरमन भगवान साकोरे, शेखर कर्पे, प्रसाद कर्पे, आण्णा गवारे आदींनी केले.