नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवून आपने एकतर्फी बहुमत मिळविले आहे. दुसरीकडे भाजप आणि कॉंग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे. ही निवडणूक भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची होती. भाजपने मोठी फौज दिल्ली निवडणुकीसाठी मैदानात उतरविली होती. मात्र तरीही भाजपला यश आले नाही. दरम्यान आम आदमी पक्षाच्या विजय झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीच्या जनतेसाठी केजरीवाल यांच्याकडून कामाची अपेक्षा देखील केली आहे. ट्वीटरवरून मोदींनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडणुकीत मोदी विरुद्ध केजरीवाल असे चित्र रंगविण्यात आले होते.