आपण सारेतर्फे रन फॉर चलेजाव -क्रांती दौड

0

ठाणे । 9 ऑगस्ट रोजी झालेल्या चलेजाव चळवळीला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आपण सारे या सामाजिक संस्थेतर्फे पंचरंगी आठव्या रन फॉर चलेजाव या क्रांती दौड रोड रेसेसचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आठ गटामध्ये होणार्‍या या शर्यती 6 ऑगस्ट रोजी ठाणे शहरातील खेवरा सर्कल भागात रंगतील.

महिला आणि पुरुष गटासाठी 10 किलोमीटर अंतराची आणि 18 वर्ष गटातील मुले-मुलीसाठी 6.5 किलोमीटर अंतराची शर्यत असणार असून, या शर्यतीत ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील धावपटूना सहभागी होता येईल. याशिवाय ठाणे महापलिका क्षेत्रातील शाळापुरता मर्यादित असणार्‍या 12 वर्षे गटातील मुले-मुलीसाठी 3 किलोमीटर आणि 15 वर्षे मुले मुली गटासाठी 4 किलोमीटर अंतराची शर्यत असणार आहे.

पुरुष आणि महिला गटाच्या शर्यतीसाठी 300 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल, तर कनिष्ठ गटातील धावपटूना स्पर्धेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे . विजेत्यांना सुमारे 2.5 लाख रुपयाचे रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक बाळकृष्ण पूर्णेकर यांनी सांगितले. स्पर्धेच्या प्रवेशिका 24 जुलैपर्यंत स्वीकारल्या जातील. न्यू होरायझनच्या व्यवस्थापनाखाली होत असलेल्या या शर्यतीविषयी अधिक माहिती आणि प्रवेशिकेसाठी बाबू यादव याच्याशी 9920857555 यांच्याशी प्रशांत आंब्रे यांच्याशी 9594667961 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेच्या प्रवेशिका क्रांती दौड , दुसरा मजला सेन्ट्रल काँग्रेस कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय जवळ,ठाणे पश्चिम इथेही उपलब्ध आहेत.