‘आप’तर्फे जन अधिकार रॅली; शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा सहभागी

0

नवी दिल्ली- देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये सत्ता प्रस्थापित करणारी आम आदमी पक्ष आता देशातील इतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपकडून नोएडामध्ये आज जन अधिकार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. तसेच या रॅलीत भाजपचे नाराज नेते शत्रुघ्न सिन्हा आणि माजी विदेश मंत्री यशवंत सिन्हा उपस्थित राहणार आहेत. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल निवडणुकांशी संबधीत काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यसभा खासदार आणि युपीचे प्रदेश प्रभारी संजय सिंह उत्तर प्रदेशमध्ये जन अधिकार पदयात्रा करणार आहेत. सहारनपूर येथून सुरू होणारी ही यात्रा मुजफ्फरनगर, शामली , मेरठ, गाजियाबाद या मार्गाने जाणार आहे. त्यानंतर नोएडामध्ये रॅलीद्वारे ही यात्रा संपन्न होईल. नोएडातील सेक्टर ४६ मध्ये दुपारी ३ वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आप देशातील महत्वाच्या जागांसाठी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. जवळपास १०० उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात राहतील. ज्यामध्ये युपी, दिल्ली आणि हरियाणा राज्यांचा समावेश आहे.