आपत्कालीनसाठी 84 कर्मचार्‍यांची बदली

0

जळगाव । शहरात मोठ्या प्रमाणांवर पर्जन्यवृष्टी होवून आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी महापालिकेडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यानुसार महापालिका प्रशासनाने आपत्कालीन विभागात तात्पुरत्या स्वरूपात 84 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. या कर्मचार्‍यांच्या बदलीचा आदेश उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिले आहेत. शहरात रविवारी मृग नक्षत्राचा पाऊस केवळ अर्धातास पाऊस आला होता. या अर्धातासाच्या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.

मिळणार तत्काळ मदत
जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी महापालिका प्रशासानाने आपत्कालीन विभागात तात्पुरत्या स्वरुपात 84 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. याबाबत आज उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी आदेश काढले. शहरात मृग नक्षत्राचा रविवारी अर्धातास पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.

तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक
रविवारी मृग नक्षत्राच्या पावसामुळे शहरातील काही भागातील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास नाल्याकाठावर तसेच सखल भागात पुरजन्य परिस्थीती निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरीत मदत मिळावी यासाठी मनपाने आपत्कालीन विभागात महापालिकेतील विविध विभागातील कर्मचार्र्‍यांची तात्पुरत्या स्वरुपात नेमणुक केलेली आहे.

तीन शिप्ट 24 तास सेवा
तीन शिप्टमध्ये 24 तास सेवा सुरू राहणार आहे. त्यांच्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हे वेळापत्रक 24 सप्टेंबरपर्यंत तयार करण्यात आलेले आहे. दरम्यान, या काळात कर्मचार्‍यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. एका शिप्टमध्ये एक लिपीक, शिपाई असणार असेल. गोलाणी मार्केट येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात आपत्कालीन कक्ष असणार आहे.