नवी दिल्ली: उद्या होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदाना आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खळबळजनक विधान केले असून, दिल्लीतल्या मुस्लिमांनी शेवटच्या क्षणात कॉंग्रेसला मतदान केल्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या ७ जागा धोक्यात आल्या आहेत. त्यांच्या या विधानावरून खळबळ उडाली आहे. यावरून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांना नेमके म्हणायचे काय आहे हे कळाले नसून नागरिकांना कोणत्याही पक्षाला मतदान देण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. दिल्लीतील लोकसभेच्या दिल्लीतील सातही जागांवर ‘आप’ विजयी होईल असे आम्हाला मतदानाच्या ४८ तास अगोदर वाटत होते, पण ऐन वेळी मुस्लिमांनी कॉंग्रेसला मतदान केले. नेमके मुस्लीमांची मते कॉंग्रेसला कशामुळे गेली हा तपास आम्ही करत असल्याचे त्यांनी म्हटले.
शिला दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांना लक्ष करत दिल्लीतील जनतेला दिल्ली सरकारचे गव्हर्नन्स मॉडल काही समजलेले नाही आणि पसंतही पडलेले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.