कुणाचाही नामोल्लेख टाळत डागली तोफ : वाघोडला बुथ प्रमुखांचा मेळावा
रावेर (शालिक महाजन)- मी मंत्री पदापासून दूर आहे तेव्हापासून बर्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. जनतेचे प्रश्न मी परखडपणे मांडतो व ते सोडविण्यासाठी भांडतो म्हणून माझ्या या कडक स्वभावामुळे मी नकोसा झालो आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. वाघोड येथे गण व बुथ प्रमुखांचा शनिवारी मेळावा झाला. याप्रसंगी एका कार्यकर्त्याने रस्त्याच्या प्रश्नाबद्दल छेडले असता खडसे यांनी वरील उद्गार काढले. दरम्यान, शुक्रवारी रात्री मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचा नामोल्लेख टाळत त्यांचा आता मंत्री मंडळात प्रवेश होणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांचीदेखील ईच्छा आहे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील यास पुष्टी असल्याचा दावा केला होता.