आपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येकाने मतदार नोंदणी करावी

0

रावेर। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास एक मतदानाचा हक्क दिला आहे. आपले एक मतदान अमुल्य असून त्यामुळे देशात महत्वपूर्ण बदल घडविले जाऊ शकतात. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांची जाणीव ठेवून मतदार नोंदणी करुन मतदान करावे असे आवाहन तहसिलदार विजयकुमार ढगे यांनी केले.

तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करा, असे आवाहन केले. नवमतदारांना यादीत समाविष्ठ करून घेण्यासाठी महाविद्यालयात हे अभियान राबवण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.बी.अंजने, तर तहसीलदार ढगे, नायब तहसीलदार कविता देशमुख उपस्थित होते. मतदार नोंदणीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विक्रम राठोड, पी. आर. महाजन, नीता वाणी, सतीष वैष्णव, जे. पी. नेहेते, एच. एम. बाविस्कर, डी. बी. पाटील, प्रा. व्ही.एच. पाटील यांनी सहकार्य केले.