उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या पराभवाने निराश होऊ नका. आपली स्वप्न मोठी आहेत. आपली लढाई आता सुरू झाली आहे अशी भावनिक साद काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना घातली आहे.
निवडणुकीचा निकाल लागायला सुरूवात झाल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मोठी पीछे हाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता खचून जाऊ नका आपली लढाई आता सुरु झाली आहे अशी भावनिक साद प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घातली आहे.