भुसावळ । आपले परिवार वाचनालयातर्फे तालुक्यातील दहावी, बारावी परिक्षेत प्रथम व द्वितीय तसेच कला, वाणिज्य, विज्ञान व प्रत्येक शाखेतून प्रथम व नीट परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सेाहळा रविवार 9 रोजी सकाळी 11 वाजता संतोषीमाता सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती पोपट भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समिती सभापती सुनिल महाजन, उपसभापती मनिषा पाटील, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी आदी मान्यवर उपस्थित राहतील. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष प्रमोद सरोदे, भालचंद्र इंगळे, प्रकाश चौधरी, शांताराम पाटील, अजय वाघोदे, कमलाकर महाजन, अनिकेत पाटील, सुनिल भिरुड, विधीतज्ञ पी.ई. नेमाडे व कार्यकारी मंडळाने केले आहे.