शिरपूर । आपले व्यक्तिमत्व चांगले असण्यासाठी आपले वक्तृत्व चांगले असले पाहिजे. स्पर्धा परिक्षा किंवा आधुनिक जगात चांगल्या वक्तृत्वाला अतिशय महत्त्व आहे. आपले विचार मोजक्या शब्दात, प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत. म्हणून वक्तृत्व स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
स्पर्धेंचा निकाल
या स्पर्धेसाठी प्राथमिक गटात प्रथम- मोहिनी देवरे , द्वितीय- धैरवी पाटील , तृतीय- प्रतिक्षा पाटील. माध्यमिक गटात प्रथम सेजल पाटील ,द्वितीय- नंदिनी पवार , तृतीय- क्रांती वाल्हे व युक्ता बडगुजर. तसेच ज्युनिअर,सिनियर गटात प्रथम- स्वप्नाली पाटील , द्वितीय- साधना चव्हाण ,तृतीय- प्रेरणा चौधरी व शुभम चांगण. या स्पर्धांसाठी परीक्षण प्रा. ज्योती राणे, स्वप्नील सोनार,रावसाहेब चव्हाण यांनी केले. तर आयोजन डॉ. एन.एन.लुंगसे, एन.जी.पिंगळे,प्रा.ए.एस.देशमुख,एन.पी.कापडे,निलेश देसले,डॉ.मनिषा वर्मा यांनी केले. सुत्रसंचालन व आभार एन.पी.कापडे यांनी मानले.
मान्यवरांची उपस्थिती
व्यंकटेश क्रीडा महोत्सवानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक स्पर्धांतर्गत आज वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे होते. यावेळी सचिव रोहित रंधे, उपप्राचार्य एस.टी.ठाकरे, उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र ग्रंथालय सेल महिला कमेटीच्या अध्यक्षा सारिका रंधे, डॉ.व्ही. व्ही. रंधे, स्कूल कमेटीच्या डायरेक्टर हर्षाली रंधे,डॉ.मनोज निकम उपस्थित होते.