आपले सरकार पोर्टलवर नागरीकांच्या तक्रारींचा उडाला बोजवारा

0

अ‍ॅपवर तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याचा नागरीकांचा अनुभव

यावल- ‘आपले सरकार’ या पोर्टलवर नागरीकांच्या विविध तक्रारी आणि समस्या नोंदवण्यात येऊन त्याचे निराकरण करण्याचे काम शासनाकडून सुरू करण्यात आले आहे मात्र या अ‍ॅपवर वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याचा अनुभव मारूळ येथील नागरीकांना येत असून या पोर्टलचा पुरता बोजवारा उडाला दिसत आहे. गावात अस्वच्छतेने कळस गाठला असून गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आह. किनगावात घडलेल्या अतिसारच्या लागणाची पुुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असूुन आता थेट तहसीलदारांना साकडे घालण्यात आले आहे.

मारूळ ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
तालुक्यातील मारूळ गावात गटारी मोठ्या प्रमाणात तुंबल्या असून नियमित स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक गटारी फुटल्या असून त्या दुरूस्तीअभावी सांडपाण्याचा निचरा न होता पाणी थेट रस्त्यावरुन वाहत आहे तर गावातील या अस्वच्छतेबाबत मोर मध्यम प्रकल्पचे अभियंता एस.एस.शेख यांनी गावातील अस्वच्छतेचे फोटो, गटारींचे वास्तवचित्र व सांडपाण्याची समस्या बाबत थेट ‘आपले सरकार’ या ऑनलाईन पोर्टलवर जुलै महिन्यात तक्रार केली व त्यांच्या तक्रारीनंतर त्यांना ती तक्रार सोडवण्यात यावी म्हणुू यावल पंचायत समितीला सुचना करण्यात आल्याचे कळवण्यात आले मात्र जुलै महिन्यातील तक्रारीचे निवारण झाले नाही म्हणुन त्यांंनी पुन्हा ऑगस्ट महिन्यात या पोर्टलवर पुन्हा तक्रार नोंदवली व पुन्हा त्यांना आपली समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पंचायत समिती, यावल यांना सुचना करण्यात आल्याचे कळवण्यात आले. तेव्हा शासनाकडून गाजा वाजा करून या पोर्टलवरील तक्रारीची तत्काळ दखल घेवुन समस्या सोडवण्याचे वादे पार फोल ठरतांना दिसत आहे. केवळ या पोर्टलवर वायफळ खर्च होत कामाचा मात्र बोजवारा उडालेला दिसत आहे. तेव्हा त्यांनी कंटाळून शेवटी तहसीदारांकडे तक्रार केली असून गावातील आरोग्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

अतिसाराचा धोका
दोन महिन्यांपूर्वी उद्भवलेली समस्या आता मोठी झाली असून सर्वत्र अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी व त्यातचं सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन आणी व्हॉल्व्हजवळ साचणार्‍या पाण्यामुळे गावात अतिसाराचा धोका संभवतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाकडून नागरीकांच्या समस्या सोडवण्या करीता ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार केंद्र सुुरू करण्यात आले. त्यात त्या-त्या गावातील समस्यांचे फोटो व टाकून तक्रार करायची आहे नंतर त्याचं ठिकाणी शासकीय यंत्रणा जावून तक्रार निवारण करेल, असे सांगण्यात आले मात्र एका अभियंत्यांकडून केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे पोर्टल निरूपयोगी दिसत आहे.