‘माझ्या आयुष्याचे पाने‘ या पुस्तकाचे प्रकाशन
जळगाव । विद्यार्थी दशेतच आपल्या करीयर विषयी गांर्भीयाने विचार केला पाहिजे. महाविद्यालयीन जिवनात पदार्पण केल्यानंतर भविष्यात आपल्याला कुठल्या क्षेत्रात आपल्याला करियर करायचे आहे हा निर्णय घेणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनात यायचे असेल तर आव्हान स्विकारले पाहिजे असे मत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले. त्या युनिक अकॅडमीतर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल सभागृह लेवा भवन येथे आयोजित व्याख्यानात बोलत होत्या. याप्रसंगी युनिक अकॅडमीचे संचालक सुनील देशमुख, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विकास बोडके, प्रा.सुनील गरुड उपस्थित होते. स्पर्धा परिक्षा देतांना पालकांना व स्वतःला फसवू नका, परीक्षा पास होणे हे ध्येय ठेवून पास होऊन दाखवा असेही बोलवणकर यांनी स्पष्ट केले. परिक्षा देतांना वेळेचे नियोजन करा, प्रश्न समजून घ्या, जो प्रश्न येत असेल तो आधी सोडवा असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर आभार प्रा. सुनली गरूड यांनी मानले.