माझ्यावर फडणवीसांचे अधिक प्रेम: गिरीश महाजन

0

जामनेर: ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालय उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप सहकार्य केले आहे. बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी असल्याने  फडणवीस खूप व्यस्त आहेत. मात्र तरीही त्यांनी वेळ काढून जामनेर येथे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले. माझ्यावर फडणवीस यांचे अधिक प्रेम आहे, माझ्याविषय असलेल्या प्रेमामुळेच ते जामनेरला आले असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जामनेर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, पुणे येथे होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया जामनेर येथे होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात शासनाकडून एक रुपयाही न घेता कोरोनावर उपचार केले. अनेक कार्यकर्त्यांनी कोरोना काळात रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

 

आरोग्य विषयक सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.