मुंबई-पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे. मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळते असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर अखेर त्यांनी आज माफी मागितली आहे.
विशेषत: सोशल मीडियावर ते टीकाकारांचे लक्ष्य बनले होते. माझ्या वक्तव्यामुळे जरा लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण देताना आठवले यांनी मला पत्रकारांनी विचारले होते की, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. तुम्हाला याचा त्रास होत नाही का ? सरकारने मला वाहन दिले आहे. त्यामुळे मला काही अडचण नाही. पण लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. किंमती कमी व्हायला हव्यात. कोणाचा अपमान व्हावा म्हणून मी असे म्हटलो नव्हतो, हेही त्यांनी स्पष्ट केले.