आपसातील मतभेद विसरा !

0

नंदुरबार । काँग्रेस पक्षाला मोठ्या इतिहास परंपरा लाभलेली आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी राजीव गांधी व आघाडी सरकारच्या काळातच आदिवासींचा विकास झाला असून आता तर भाजपाच्या काळात उज्वला गॅस योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना खासदारांच्या पत्राची गरज भासत असल्याचे भासत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.तालुक्यातील धानोरा येथे गुरुवार, दिनांक 6 रोजी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी बोलत होते.

आश्‍वासने ठरली फोल
मेळाव्याचे प्रास्ताविक जि.प सदस्य विक्रमसिंग वळवी यांनी केले. यावेळी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, चार वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जनतेला जे जे आश्‍वासने दिली होती ते सर्व फोल ठरली आहेत. त्याची अंमलबजावणी आजतागायत करण्यात आलेली नाही.आदिवासींच्या खरा विकास काँग्रेसच्या काळातच करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू चौरे, पंचायत समितीच्या सभापती रंजना नाईक, उपसभापती ज्योतीबाई पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे, सुभाष राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पाटील, माजी जि.प सदस्य भरत पाटील, युवराज पाटील जि.प चे माजी अध्यक्ष रमेश गावित, जि. प सदस्य रतन पाडवी, पं.स सदस्य स्वरूप सिंग वळवी, नगरसेवक परवेज खान ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुनील पाटील, रोहिदास पाटील, दिलीप पाटील, आनंदराव कदमबांडे, सुरेश शिंत्रे, किशोर पाटील, आदी उपस्थित होते.

…अन्यथा काँग्रेसमधून हकालपट्टी
काँग्रेस पक्षात काम करत असताना पक्षाच्या विचारधारेनुसार कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी काम करणे अपेक्षित आहे. कोणीही अंतर्गत राजकारण करू नये. आपसी मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा. आपापसातील हेवेदावे यांमुळेच धानोरा ग्रामपंचायत हातातून निसटली. पक्षाशी जे पुणे कार्यकर्ते व पदाधिकारी गद्दारी करत त्यांची तात्काळ हाकलपट्टी करण्यात येणार असल्याच्या इशारा आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी मेळाव्यातून दिला.