आप्पा तुमच्यासारखाच ‘जनसामान्यांसाठी संघर्ष करेल-धनंजय मुंडे

0

स्व. गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली

परळी – आदरणीय अप्पा, (स्व.गोपीनाथराव मुंडे) आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. ‘जनसामान्यांसाठी संघर्ष’ या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन !” अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी स्व. मुंडे साहेबांना आदरांजली वाहिली.

आज सकाळीच त्यांनी जगमित्र कार्यालयात साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच “लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ‘जनसामान्यांसाठी संघर्ष’ करण्याची दिलेली शिकवण सदैव अनुसरेन” अशा भावना ट्विट करून व्यक्त केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.