ड्युनेडिन । दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर दिले.न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचे शतक महत्वपुर्ण ठरले आहे.त्याला संघातील इतर फलंदाजांनी साथीच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेने दिलेले धावांचे आव्हांन पेलत पहिल्या डावात 341 धावा करून 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर शुक्रवारी तिसर्या दिवसअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात 1 बाद 38 धावा केल्या होत्या. आफ्रिकेकडे आता 5 धावांची आघाडी आहे.यासामन्यात फायर अलार्म वाजल्यामुळे 20 मिनिटे खेळ थांबला होता.मैदानाची कसून तपासणी केल्यानंतर काहीच निघाले नाही.
अखेरच्या सत्रात फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्टिफन कूक शून्यावर बाद झाला. त्यानंतर डीन एल्गर आणि हशिम अमला यांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. अपुर्या प्रकाशामुळे खेळ थांबला, तेव्हा एल्गर 12, तर अमला 23 धावांवर खेळत होते.
स्कोअरबोर्ड : दक्षिण आफ्रिका 308 आणि 18 षटकांत 1 बाद 38 (हशिम अमला खेळत आहे 23, डीन एल्गर खेळत आहे 12) विरुद्ध न्यूझीलंड 114.3 षटकांत 341 (केन विल्यमसन 130, जीत रावल 52, बीजे वॉटलिंग 50, केशव महाराज 5-94, मॉर्ने मॉर्केल 2-62).
विल्यमसनचे 16 वे शतक
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 308 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते. याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने दुसर्या दिवशी 3 बाद 177 धावा केल्या होत्या. पहिल्या सत्रात झटपट दोन विकेट गेल्यानंतर विल्यमसनने बीजे वॉटलिंगसह सहाव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचली. विल्यमसनने कसोटी कारकिर्दीतील सोळावे शतक झळकावताना 241 चेंडूंमध्ये 18 चौकारांसह 130 धावांची खेळी केली. विल्यमसन बाद झाल्यानंतर वॉटलिंगने तळातील नील वॅग्नरच्या साथीने संघाचे त्रिशतक धावफलकावर लावले. वॉटलिंगने 128 चेंडूंमध्ये 8 चौकारांसह 50, तर वॅग्नरने 32 धावा केल्या. आफ्रिकेच्या केशव महाराजने 94 धावांत 5 विकेट घेतल्या.