बर्मिंगहॅम । ‘पाकिस्तानी संघ टुकार खेळला… त्यांनी भारतापुढे अक्षरशः लोटांगण घातले… कर्णधार सरफराजचे डावपेच अगदीच बोगस होते. त्यामुळे टीम इंडियाने पाकवर वर्चस्व गाजवून जेतेपदावरील दावा भक्कम केलाय…”भारत-पाकिस्तानची लढाई अगदीच एकतर्फी झाली. पाक इतके ढिसाळ खेळले की सामन्यात चुरस पाहायलाच मिळाली नाही. पाकिस्तानचा पाठीराखा म्हणून हे चित्र वेदनादायी होते. पण, टीम इंडियाचे कौतुक करावेच लागेल. पाकला पुन्हा एकदा नमवून त्यांनी आपले बुलंद इरादे स्पष्ट केलेत’, असे आफ्रिदीने आयसीसीसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.