रावेर : तालुक्यातील आभोडा येथे १९ वर्षीय विवाहितेवर एकाने अत्याचार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आभोडा येथील १९ वर्षीय विवाहितेवर बुधवार, २ जून रोजी सिंदखेडा शेती शिवारमध्ये संशयीत आरोपी भास्कर कावडकर याने अत्याचार केला. दरम्यान, अमोल धनगर, महेश महाजन, आनंदा कावडकर, ललित महाजन, नितीन पाटील (सर्व रा.रमजीपूर) यांनी पीडीत महिलेझड काका गावसिंग बारेला यांना मारहाण करून दुचाकीची तोडफोड केल्याने त्यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात अॅट्रासिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट दिली.
परस्पर विरोधी गुन्हे दाखल
दरम्यान, याच गुन्ह्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्या आला. यात रमजीपूर येथील भास्कर कावडकर यांच्या फिर्यादीनुसार, नकाराम बारेला यास पैसे उसनवार दिल्याने याचा राग आल्याने नकाराम बारेला, शांताराम बारेला, दालसिंग बारेला, परमसिंग बारेला या चौघांनी फिर्यादीस लाठ्या-काठ्याने मारहाण करून दुखापत केली. संशयीत आरोपींविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीष सानप करीत आहेत.