साईबाबा फाउंडेशन व तडवी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
रावेर- तालुक्यातील आभोडा येथे साईबाबा फाउंडेशन व तडवी समाजातर्फे आयोजित आठव्या सामूहिक विवाह सोहळ्यात 12 जोडपी विवाहबद्ध झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे विक्री कर अधिकारी नासीर तडवी होते. सामूहिक विवाह मेळावे होणे काळाची गरज असून त्यासाठी समाजबांधवांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राजू अमीर तडवी, उखर्डू कासम तडवी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, संदीप सावळे, सोपान पाटील, अजीत सर, हमीद भाईखा, राजू इब्राहिम तडवी, महेबूब तडवी, सलीम तडवी आदी उपस्थित होते. मौलाना महेरबान यांनी निकाह खुतबा पठण केला. साईबाबा फाउंडेशनतर्फे नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. आयोजक गुलजार सरदार, दिलदार शितरु, चांद खा, नजीर तडवी, कादर तडवी आदींनी परीश्रम घेतले.