जळगाव। येथील जिल्हा हौशी कॅरम संघटना व प्लाझा क्रिडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमंत्रितांच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सैय्यद मोहसीनने आपल्याच संघबांधव योगेश घोंगडेचा निर्णायक सेटमध्ये 25-23 असा पराभव करुन विजेतेपद प्राप्त केले. नईम अन्सारी आणि सतिश शर्मा यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकाविला.
पारितोषीक वितरण
पारितोषिक वितरणप्रसंगी युसूफशाह, शेखर नखरीया, सैय्यद मसुद, फिरोज खान, शेख अजिज, सलिम अन्सारीव रज्जाकभाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेला सर्वश्री अब्बासभाई अमरेलीवाला, हाजी मंजुर खान, युसूफ शाह, कैलास राजपूत यांच्यातर्फे आर्थिक सहकार्य मिळाले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वश्री नासिरखान, फिरोज खान, शरिफ खान, शेख अजिज, सैय्यद रिजवान, रंगनाथ पाटील, सत्तार कुरेशी, रमीज राजा, खालीद शेख, सैय्यद जुबेर, समीर शेख इत्यादींनी परिश्रम घेतले.