मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र बहुमत नसल्याने भाजपकडून सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. दरम्यान कॉंग्रेसचे सर्व आमदार जयपूरला थांबून आहे. याठिकाणी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांची भेट घेऊन चर्चा केली आहे. चर्चेनंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला असून आम्ही विरोधातच बसणार असल्याचे सांगितले आहे. परंतु शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले आहे. यावरून आता पुन्हा राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे.
शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार बनविणार असल्याची चर्चा आहे, मात्र कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी याला नाकारले आहे.