‘आमचे बॉम्ब जगाच्या विनाशाला पुरेसे’

0

उत्तर कोरिया । ‘आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि त्यातील फक्त तीन बॉम्ब संपूर्ण जगाचा विनाश करण्यास पुरेसे आहेत,’ अशी धमकी उत्तर कोरियाचे किम जोंग यांनी दिली आहे.

अफगाणिस्तानातील आयएसच्या तळांवर अमेरिकेने अलीकडेच ’मदर ऑफ ऑल बॉम्ब’ टाकला होता. आयएसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. याबाबत उत्तर कोरियाचे पश्‍चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी ही धमकी दिली आहे. ‘उत्तर कोरियाला कोणी स्पर्शही करू शकत नाही. तसे झाल्यास कोरियन जनता बंदुका आणि क्षेपणास्त्रांचा ताबा घेऊन देशाचे संरक्षण करेल,’ असेही त्यांनी सांगितले.

एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी युद्धविषयक तयारीची माहिती दिली. ‘उत्तर कोरिया हा स्वप्नलोक आहे. उत्तर कोरियात लोकांच्या जीवाला धोका नाही. ते आपले जीवन अतिशय शांततेत जगत आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचा सामाजिक संघर्ष नाही. सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने आपली कामे करतात. येथील जनता रस्त्यावर झोपत नाही,’ असेही त्यांनी सांगितले.