मुंबई: महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्जमाफी कधी होणार? हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यातच सोशल मीडियावर देशमुख बंधूनी कर्ज घेतल्याच्या सातबारा व्हायरल होत आहे. यावर तब्बल ४ कोटींचे कर्ज असल्याचे लिहिले आहे. कर्जमाफी झाली तर त्याचा फायदा देशमुख बंधूना होईल असे सांगण्यात येत असून टीका देखील होत आहे. दरम्यान यावर अभिनेता रितेश देशमुख यांनी खुलासा केला आहे. आमच्यावर कोणतेही कर्ज नसून सोशल मीडियावर निव्वळ अफवा पसरविल्या जात आहे.
‘माझ्यावर आणि आमदार अमित देशमुखवर कोणतेही कर्ज नाही, बनावट कागदपत्र बनवून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे रितेश देशमुख यांनी म्हटले आहे’. आमच्यावर कर्जच नाही तर कर्जमाफीचा लाभ घेण्याचा प्रश्नच नाही असे रितेश देशमुख यांनी म्हटले आहे.