मुंबई- काल माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यानंतर नीलेश राणे यांच्यावर शिवसैनिकांनी टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायचे नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.