आमच्या भावाला खोटे बोलण्याचा नोबेल मिळेल

0

उदगीर । गोपीनाथ मुंडेनी धनजयला बाहेर काढले. आम्हाला जायचे नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी अजित पवार म्हणतात,धनजंय दीड वर्ष आमच्याकडे चकरा मारल्या. शेवटी दुसरीकडे जाणार म्हटल्यावर त्याला आम्ही घेतले. मग खोटे कोण बोलतेय हे त्यांनी जाहिर करावे.भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल, त्या म्हणाल्या, माझ्यावर कितीही टीका केली तरी बोलले नाही. परंतु आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका, उत्तर द्या़, अशी शपथ घातलीय. म्हणून मी बोलतेय. बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळून गुरुवारी उदगीरमध्ये केली.

वाढदिवसाचे नवे संशोधन

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यांतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या होत्या. गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सिंहासनावरून उतरवण्याचे काम केले आहे. पुन्हा सत्तेत बसू न देण्याचे काम आम्ही करू, इंग्रजांची राजवट गेल्यानंतर देशात काँग्रेसची राजवट आली. यांनी नागरिकांना गरिबीतच ठेवले. आता ही राजवटही दूर करा अन् भाजपाला व पर्यायाने विकासाला साथ द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, व्यंकट तेलंग, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, माजी आमदार मनोहर पटवारी, रमेश कराड यांच्यासह पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. नवीन संशोधनच यांनी सुरू केले आहे. गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस कुठला? ते आता हयात नाहीत. मृत शत्रूबद्दलही आपण वाईट बोलत नाही़ ते जिवंत नसताना हिणवण्याचे काम करू नका, असेही त्यांनी ठणकावले आहे.गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसावरून चाललेल्या वादावर बोलताना पंकजा मुंडेंनी अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले.