हाँगकाँग । ‘आमच्या वडिलांचा आणि आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होते’ आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकर्यांना पूर्णपणे माफ केले आहे, असे सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणार्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी 1984 मध्ये त्यांची हत्या केली होती.
…अन् राहूल गांधी गहिवरले
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणार्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले. ’अनेक वर्ष आम्ही निराश आणि दुखावलो होतो. पण माहित नाही… आम्ही त्यांना पूर्णपणे.. ’ असं म्हणताना राहुल यांचे शब्द अडखळले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला. राहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला.
भूमिकेची किंमत चुकवावी लागते
एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, असे राहुल गांधी म्हणाले. ’राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो.’ असे राहुल म्हणाले. ’माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होते की त्यांचा मृत्यू होणार.’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.