आमदगाव नियतक्षेत्रात जंगल पेटवले ; आरोपी जाळ्यात

0

आरोपीला चार दिवसांची कोठडी ; अतिक्रमणासाठी पेटवले जंगल

भुसावळ- मुक्ताईनगर वनक्षेत्रातील आमदगाव नियतक्षेत्रात अतिक्रमणाच्या उद्देशाने जंगल पेटवल्या प्रकरणी संशयीत आरोपी माणिक देवराम सुरवाडे (रा.आमदगाव) यास 9 रोजी वनविभागाच्या पथकाने अटक केली. आरोपीस भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 13 मे पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई आरएफओ आशुतोष बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.एम.कोळी, वनरक्षक आर.एल.ठोसर, रुपाली वानखेडे, पी.पी.शेजोळे आदींच्या पथकाने केली.