आमदगाव शिवारात डीपी फोडून साहित्य लांबवले

0

बोदवड- तालुक्यातील आमदगाव शिवारातील शेतातील शिवाजी शंकर नारखेडे यांच्या मालकीच्या शेतातील इलेक्ट्रीक डीपी अज्ञात चोरट्यांनी फोडत त्यातील साहित्य लंपास केले. चोरट्यांनी कट आऊटस सुमारे 13 हजारांचे साहित्य लांबवल्याप्रकरणी वायरमन संदीप आनंदा पाटील (बोदवड) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास विजेश पाटील करीत आहेत.