मुक्ताईनगर : दिलेला शब्द पूर्ण करण्यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच आघाडीवर असतात. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हाकाकोडा गावात सातत्याने पाणीप्रश्न भेडसावत असल्याने आमदारांनी कुर्हा ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. ग्रामस्थांना यावेळी त्यांनी गावातील पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्याची ग्वाही दिली होती व ठरल्याप्रमाणे गावठाण योजनेसाठी नवीन कनेक्शनसह वीज डीपी मंजूर केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाठपुराव्याला आले यश
आमदार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत डीपीडीसी अंतर्गत गावठाण योजनेसाठी नवीन कनेक्शनसह डीपी, ट्रान्सफार्मर मंजूर करून पाणीपुरवठा करणार्या विहिरीपर्यंत सिंगल फेज, नवीन वीज कनेक्शन मंजूर करून दिल्याने पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे.
ट्रान्सफार्मर पूजनप्रसंगी यांची उपस्थिती
ट्रान्सफॉर्मर पूजनप्रसंगी करताना शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव, युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख सतीश नागरे, सोशल सेल विभागप्रमुख दीपक वाघ, युवा सेना शहर प्रमुख अविनाश वाढे, राहुल खिरळकर, पंकज धाबे, विष्णू इंगळे, शेख फारुख, रीतेश मुलतकर व नागरीक व शिवसैनिकांची उपस्थिती होती.