पिंपरी : शेतकरी कर्जमाफीची मागणी करणार्या 19 आमदारांचे निलबंन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील आंबेडकर चौकात आमदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, सुनील गव्हाणे, विनोद कांबळे, आनंदा यादव उपस्थित होते.