आमदारांच्या निवेदनाची जिल्हाधिकार्‍यांकडून दखल

0

एरंडोल । तालुक्यातील आडगाव सहीत सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे विजवितरण कंपनीद्वारा 15 मे रोजी अचानक विज कनेक्शन कट केल्यामुळे आमदार डॉ.सतिष पाटील हे आडगाव सहीत सोळागावच्या ग्रामस्थांसोबत आमरण उपाषणाला बसणार होते. परंतु एरंडोल तालुक्याच्या दौर्‍यावर असलेल्या जिल्हाधिकार्‍यांना जेव्हा हे निवेदन मिळाले त्यांनी त्याच क्षणात सदर विभागाच्या व जि.प.च्या अधिकार्‍यांना तत्काळ कळवून विजपुरवठा नियमीत केला. तालुक्याचे आमदार डॉ.सतिष पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना तालुक्यातील आडगाव सहीत 16 गाव पाणीपुरवठा योजनेचे विज कनेक्शन विजबिल न भरल्यामुळे महावितरणने कट केले होते व त्यामुळे या योजनेवर अवलंबुन असणार्‍या गावातील लोकांवर पाण्याचे मोठे संकट येणार होते.

10 लाख रूपये दोन दिवसात भरणार
ऐन ऊन्हाळ्यात विजवितरण विभागाने ऊचललेल्या या कठोर पावलाने आडगाव सहीत सोळा गाव योजनेतील जनता मोठ्या संकटात सापडणार होती. त्यामुळे आमदार डॉ.सतिष पाटील यांनी 16 रोजी निवेदन लिहुन त्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे एरंडोल दौर्‍यावर असतांना कळविले होते. परंतु जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी लागलीच एरंडोल येथुन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व अतिरिक्त मुख्याकार्यकारी अधिकारी संजय म्हसकर यांचेशी चर्चा करुन रु.10 लाख दोन दिवसात भरण्यात येतील व ऊर्वरीत रक्कम ग्रामपंचायतीकडे असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या रकमेतुन आठ दिवसात भरण्यात येतील असे अधिक्षक अभियंता महावितरण जळगाव यांना त्याप्रमाणे सर्वांना आदेश दिले व एरंडोल येथिल उपअभियंता पी.पी.बुलबुले यांना लागलीच बोलवुन त्वरित आडगाव सहीत सोळागाव योजनेचे विजकनेक्शन जोडण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकार्‍यांनी आमदारांच्या निवेदनावर घेतलेल्या तत्काळ भुमिकेचे सोळागाव योजनेच्या ग्ररामस्थांनी आभार मानले असुन तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.