भुसावळ । खडका येथील अलमदद फाऊंडेशनतर्फे ईद मिलन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार संजय सावकारे, नगरपालिका गटनेता हाजी मुन्ना तेली, हाजी सलिम पिंजारी, अकबर पिंजारी, अकिल पिंजारी, सईद पिंजारी आदी उपस्थित होते.
खडका, मुस्लीम कॉलनीतील रहिवाशांना लाभ
कार्यक्रमात खडका गाव व मुस्लिम कॉलनी परिसरातील गोरगरिबांना मोफत रुग्णवाहिका सेवेची सुरुवात करण्यात आली असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष ईक्बाल पिंजारी यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष आसिफ पिंजारी, सचिव इसहाक पिंजारी, सहसचिव नाजिम शाह, सदस्य नदिम पिंजारी, अशफाक पिंजारी यांनी सहकार्य केले.