माजी आमदार दिलीप वाघ यांची बोचरी टीका
जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आमदार किशोर पाटील सरकार व प्रशासनासमोर हतबल
पाचोरा – पाचोरा तालुक्यात दूष्काळाची दहकता वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगांव जिल्ह्यातील समश्या समजून घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे आमदार किशोर पाटील यांना आमंत्रण नसल्याची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आमदार किशोर पाटील यांनी एका एपीआय संदीप पाटील यांची बदलीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, मतदारसंघातील शेतकऱ्यांचे बोंडअळी अनुदानापासून वंचित आहेत. अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पत्रपरिषदेला यांची होती उपस्थिती
पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. यासारखे अनेक गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमंत्रणाची वाट न पाहता विमानतळा पासून ते जिल्हा नियोजन समितीच्या दरवाजापर्यंत समश्यांचे निवेदन देण्याची संधी होती. मात्र आमदार पाटील यांनी तसे न करता निमंत्रणाची वाट पाहून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल केली. आमदार किशोर पाटील यांचा जिल्हयातील सत्तेच्या भागीदारीने आवाज क्षिण झाला असुन ते सरकार व प्रशासनासमोर हतबल झाले आहेत, असा टोला माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत लावला.
माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पक्षाचे जिल्हाप्रवक्ते खलील देशमुख, संजय वाघ, विधानसभा शेत्र अध्यक्ष नितीन तावडे, रणजीत पाटील, सतिष चौधरी, शशीकांत चंदिले उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना वाघ यांनी सांगितले की, मतदारसंघात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.
मित्रपक्षामध्ये भांडणे; मतदारसंघाचे नुकसान
मात्र आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे संदर्भात आपला राग व्देश व्यक्त करून परस्पर मित्रपक्षामध्ये भांडणे सुरू झाल्याने जिल्ह्यातील व मतदारसंघाचे प्रचंड नुकसान होत आहे. गिरणेवरील बलुन बांघारे पुर्ण होणार कि नाही या बाबत शंका त्यांनी पत्रकार परिषदेत मुद्दा मांडला परंतु आघाडी शासनाचे काळात जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी गिरणा नदिवरील बॅरेजसाठी केंद्राकडून जलसाठा उपलब्ध असल्याचा दाखला ही मिळविला होता. याची माहिती आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत मी त्यांचे अभिनंदनही करतो.
युतीच्या काळात काम खोळंबले
मात्र युती सरकारच्या काळात बॅरेज बांधाऱ्या ऐवजी बलून बांघारे केल्याने काम खोळंबले. आतापर्यंत गिरणेवर सात बॅरेटबांघारे झाले असते तर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती. शिवसेनेने बहुळा प्रकाच्या नदिजोड प्रकल्पासाठी आंदोलन केले त्याचे पुढे काय झाले. निवडणूकी नंतर बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रकल्प आनले जाणार होते त्याचे काय झाले आमदार किशोर पाटील हे जिल्ह्यातील अनेक सत्तेत सहभागी आहेत यामुळे सत्तेची फळे चाखणाऱ्यांना सत्तेच्या विरोधात पवित्रा घेणे कठीण होते हेच यातून सिद्ध होते असेही वाघ यांनी सांगितले.