आमदारांनीच खुपसला पाठीत खंजीर

0

भुसावळ ।निवडणूकीत आमदार सावकारे यांनी मला उमेदवारी न देता विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे आता यापुढे भाजपाला रामराम ठोकून लवकरच वेगळा मार्ग निवडणार असल्याचे मावळते सभापती राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. सभापती निवडीनंतर आमदार समर्थकांनी माझ्या नावाची फळी काढून पायदळी तुडविली. त्यामुळे आता कुणाच्या बुध्दीची किव करावी असा सवालही चौधरींनी उपस्थित केला.

सावकारेंच्या विरोधात काम करणार
आमदार संजय सावकारे हे गेल्या दहा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. याअगोदर त्यांनी मंत्रीपदही भुषविले आहे. मात्र त्यांना सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव नाही, नागरिकांचे फोनही ते स्विकारत नाही, याअगोदर नागरिकांचा रोष मी सांभाळून घेत नागरिकांची समजूत काढत असे आमदारांच्याच प्रेमापोटी मी राष्ट्रवीादी सोडून भाजपात प्रवेश घेतला होता. मात्र ऐन निवडणूकीत मला विश्‍वासात न घेता उमेदवारी नाकारण्यात आली. यापुढे मात्र आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात काम करुन ते निवडून येणार नाही यासाठी सर्व पक्षीयांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच नवनियुक्त सभापती सुनिल महाजन यांनी आता चांगले काम करुन दाखविल्यास नक्कीच त्यांचा सत्कार करणार असेही स्पष्ट केले.