आमदाराच्या निलंबनाविरोधात जिल्हा काँग्रेसचे निदर्शने

0

धुळे। जिल्हा काँग्रेसतर्फे अधिवेशनात 19 आमदाराच्या निलंबीत केल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. आमदारांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, 22 मार्च रोेजी विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या धुळे ग्रामीणच्या आमदार कुणाल पाटील व इतर 18 आमदारांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कर्ज पूर्ण माफ करण्यासाठी आवाज उठवला आणि जोपर्यंत शेतकर्‍यांच्या पूर्ण कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचे कामकाज होवू देणार नाही, असा आग्रह धरला. म्हणून त्याचा राग येवून सत्ताधारी भाजप सरकारने आ.कुणाल पाटीलसह इतर 18 आमदारांवर निलंबनाची कार्यवाही केली.

त्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस ही कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करणकाळ, माजी उपमहापौर इस्माईल पठाण, नगरसेवक मुजफ्फर हुसेन, मुकुंद कोठवले, भिवसन अहिरे, अकबर पठाण, मुस्ताक अन्सारी, मनजित शेख, संजय बैसाणे, बानुबाई शिरसाठ, सदाशिव पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.