चंद्रपूर । चिमूर येथील शहीद स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त शहिदांना अभिवादन करण्याकरिता गेल्या बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार, खासदार चिमूरमध्ये येणार होते. त्यानुषंगाने स्वागताचे बॅनर लावण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांना विरोध केल्याच्या आरोपावरून व काँग्रेस कार्यकर्ते विलास मोहीतकर यांनी चिमूर पोलिसांत आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्यासह आठ कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
समस्यांचे बॅनर लावणार होते
चिमूर येथे 16 ऑगस्ट रोजी शहीद स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री , अर्थमंत्री यांच्यासह मंत्री, आमदार तसेच खासदारांची उपस्थिती राहणार होती. भाजपाने ठिकठिकाणी बॅनर-पोस्टर लावले होते. काँग्रेसकडून शेतकर्यांना कर्जमाफी, माना समाजाच्या व्हॅलिडीटीचा प्रश्न, गोसेखुर्द प्रकल्पाची चौकशी, जिल्ह्याची निर्मिती आशा मागण्याचे बॅनर लावण्यार होती. या समस्याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी विलास मोहीतकर, राजु चौधरी हे शहरात 15 ऑगस्टला रात्री 11 वाजताच्या काँग्रेसचे कार्यकर्ते बॅनर-पोस्टर लावत होते. याबाबतची माहिती मिळताच भाजपाचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया याच्यासह कार्यकर्त्यांसह बॅनर मज्जाव केला. याबाबतची तक्रार मोहीतकर यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी आमदार कीर्तीकुमार भांगडीया, उमेश चौबे, बब्बु खान, गोलू भरडकर, विक्की कोरेकार, आशीष असावा, मनिष नाईक, बंटी बनकर व इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केले आहे.