कोरोनाविरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी ‘पीपीपी कीट’ खरेदीकरिता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ५० लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे वायसीएम आणि जिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात आला आहे. आमदार बनसोडे यांनी आज महापालिकेच्या कोरोना वॉररुमला भेट दिली. शहरातील परिस्थितीचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी नगरसेवक अमित गावडे, डब्बू आसवानी उपस्थित होते.
शहरातील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशी सूचना आयुक्तांना दिली. तसेच या महामारीच्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या कर्मचारी वर्गास निर्माण होणाऱ्या अडचणीबाबतही आयुक्तांसमवेत चर्चा केली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.