आमदार अनिल गोटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

0

धुळे । शहराचे आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह जिल्हाध्यक्ष मनोज मोरे व इतरांवर अतिशय गलिच्छ भाषेत स्तर खालावून सातत्याने पत्रके काढली. तसेच मनोज मोरे यांनी दिलेल्या उत्तरांना चिडून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्रक प्रसिध्दीस दिले. याचा निषेध नोंदवून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातर्फे पोलीस अधिक्षक एम.रामकुमार यांना तक्रारीसह निवेदन सादर करण्यात आले.

माजी आमदार उपस्थित यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जि.प.सदस्य किरण पाटील, उपमहापौर उमेर अन्सारी, सभापती कैलास चौधरी, सभागृह नेते अरशद पठाण, माजी महापौर मोहन नवले, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, शहर जिल्हाध्यक्ष कुणाल संजय पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.